Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडपरळीओबीसी आरक्षणासाठी परळी तहसीलसमोर मोर्चा, निदर्शने

ओबीसी आरक्षणासाठी परळी तहसीलसमोर मोर्चा, निदर्शने


परळी (रिपोर्टर):- महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत ओबीसी संघटनेच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. या मोर्चामध्ये माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रा. पी.पी. मुंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात ओबीसी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ओबीसी संघटनेच्या वतीने केला जाऊ लागला. आज परळी तहसील कार्यालयावर ओबीसींनी मोर्चा काढत निदर्शने केली. सदरील हा मोर्चा माजी आ. प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, प्रा. टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. या वेळी बाजार समितीचे विजय मुंडे, प्रदीप मुंडे, भीमराव सातपुते, विलास ताटे, अनिल मस्के, भास्कर रोडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

parali obc.JPG 2


ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या -टी.पी.मुंडे
ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी जनमोर्चा कार्यरत आहे. आजचा मोर्चा ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेला आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी असून ओबीसीत इतरांना समाविष्ट करू नये, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी ओबीसी जनमाणसाची असल्याचे प्रा. मुंडे यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!