Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडमराठा आरक्षणासह अन्य प्रश्‍नांसाठी आ.धसांचा एल्गार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मराठा आरक्षणासह अन्य प्रश्‍नांसाठी आ.धसांचा एल्गार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


बीड (रिपोर्टर):- मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. आता कुठं राज्याने विनंती याचिका दाखल केली आहे. याबाबत योग्य माहिती द्यावी व मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करावा या प्रमुख मागणीसह सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीची रक्कम पुर्णत: शेतकर्‍यांना देण्यात यावी व पिक विम्याबाबत ज्या अधिकार्‍यांकडून चुका झालेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करत ऊसतोड कामगारांसाठी कायदा करावा या मागणीसाठी २८ जून सोमवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी दिली.


ते बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे. आता कुठं राज्याने विनंती याचिका केली आहे. याबाबत योग्य माहिती द्यावी, मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करावा याबाबत २८ जून सोमवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये
बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये शेतकर्‍यांना पिक कर्ज देण्याबाबत सूचना दिलेल्या असल्या तरी बँका शेतकर्‍यांना पिककर्ज देत नाहीत. एवढेच नाही तर सरकारकडून दिल्या गेलेल्या कर्जमाफीच्या रकमेची एफडी करतात. ती रक्कम शेतकर्‍यांना दिली जात नाही. तब्बल १६०० कोटींची कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली पाहिजे. बीड पीक विमा पॅटर्नचा डांगोरा पिटवला जातो, मात्र बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गेल्या वर्षी पिक विमा मिळाला नाही. ज्या अधिकार्‍यांच्या चुका असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ऊसतोड कामगारांसाठी कायदा तात्काळ करावा, त्याचबरोबर आम्ही ८० टक्क्यांची भाववाढ मागीतली होती त्यापैकी केवळ १४ टक्के भाववाढ झाली. उर्वरित ६६ टक्के भाववाढ मिळाली पाहिजे. २२ मार्च २०२० पासून ज्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी कोविडमध्ये काम केले आहे त्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, या लोकांनी अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये काम केलेले असताना त्यांना कामावरून काढले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांचा हेतू शुद्ध नसल्याचे स्पष्ट दिसते. असं म्हणत आ. सुरेश धसांनी बीड जिल्ह्यात केवळ गेवराई, माजलगाव, परळी या ठिकाणीच वाळुचे ठेके आहेत, अन्य ८ तालुके जिल्ह्याच्या बाहेर आहेत का? असा सवा करत आ. सुरेश धसांनी या तालुक्यात एक तरी वाळु घाट चालू करावा, आणि त्यातून सर्वप्रथम घरकुलासाठी वाळु उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचे पेशंट वाढत असताना त्याचे इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत का? त्याची तयारी करावी, कोविडमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, राज्य महामार्गामध्ये ज्यांच्या जमीनी गेलेल्या आहेत त्या शेतकर्‍यांना तात्काळ मावेजा मिळावा, या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा असणार असल्याचे आ. धसांनी म्हटले आहे.

आता लोकसभा लढवणार नाही
स्व. मुंडे साहेबांच्या विरोधात एकदा बळच लोकसभेची निवडणूक लढविली आणि तिथे पराभवही झाला. आता मात्र यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सुरेश धसांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!