Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईममाजलगावमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा; जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखात रस्त्यावर मारामारी

माजलगावमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा; जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखात रस्त्यावर मारामारी


माजलगाव (रिपोर्टर):- शिवसेनेचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाप्रमुख आणि माजलगाव शिवसेना शहरप्रमुख यांच्या दोन गटांमध्ये रस्त्यावर तुंबळ मारामारी झाल्याची घटना आज घडली असून नवनिर्वाचित जिल्हाप्रमुखांकडून शहरप्रमुखांवर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येते. नवनिर्वाचित जिल्हाप्रमुखांची मिरवणूक सुरू होती त्यावेळी हा सर्व प्रकार माजलगावच्या भररस्त्यावर घडल्याने खळबळ उडाली आहे.

sena free stail
गेल्या दोन दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यातील ग्रामीणचे शिवसेना जिल्हाप्रमुख पद माजलगावचे आप्पासाहेब जाधव यांच्याकडे आल्यानंतर या निवडीचा निषेध शिवसेना शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी केला होता. त्यामुळे माजलगावमध्ये शिवसेनेत दोन गट पडल्याचे समोर आले. आज सकाळी जेव्हा नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची माजलगाव शहरातून  मिरवणूक निघाली तेव्हा शिवसेनेच्या दोन गटांमध्ये प्रचंड राडा झाल्याचे सांगण्यात येते. या वेळी आप्पासाहेब जाधव समर्थकांकडून शहरप्रमुख धनंजय सोळंके यांच्यावर हल्ला करत त्यांना खाली पाडून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओही व्हायरल जाला आहे. माझ्या निवडीला विरोध का करतो म्हणून जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी धनंजय सोळंके यांच्यावर हल्ला केल्याचे सोळंके यांनी सांगितले. या हल्ल्यात धनंजय सोळंके हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर दुसरीकडे मिरवणूक सुरू असताना सोळंके यांनी आप्पासाहेब जाधव यांच्यावर ऑईल फेकल्याचेही सांगीतले जात आहे मात्र बीड जिल्ह्यात शिवसेना पदाधिकार्‍यांची निवड झाल्यानंतर माजलगावमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याचे समोर येते. या प्रकरणात दोन्ही गट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू होती. 

निवडीचा निषेध करण्यासाठी उतरलो म्हणून हल्ला -धनंजय सोळुंके
मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी खरं तर कडवट शिवसैनिकांच्या गळ्यामध्ये जिचल्हाप्रमुखपदाची माळ घालायला हवी होती मात्र तसे झाले नाही म्हणून मी आज निवडीच्या निषेधार्थ बाहेर आलो होतो तेव्हा नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी माझ्यावर हल्ला चढवला. याचा मी निषेध करतो, असे धनंजय सोळुंके यांनी म्हटले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!