Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeखेळभारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार

भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार

IND vs ENG : कोरोना संकटात खेळांची मैदानंही ओस पडली. अनेक स्पर्धा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आल्या. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. अशातच ऑस्ट्रेलिया दौरा आटपून भारतात परतल्यानंतर भारतीय संघ दोन महिन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार ऑगस्ट रोजी ट्रेंट ब्रिजमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट रोजी लॉर्ड्समध्ये, तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत हेडिंग्लेमध्ये, चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत ओवलमध्ये, तर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 10 ते 14 सप्टेंबरपर्यंत ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने काल यासंदर्भात घोषणा केली. भारतासोबतच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ श्रीलंका आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावरही जाणार आहे.

भारताने गेल्यावेळी जेव्हा टेस्ट सीरिजसाठी इंग्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात 1-4 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये एका कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचा पाहुणचार करणार आहे. असं सांगण्यात येत आहे की, इंग्लंड भारतीय मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या संघासोबत 29 जून ते चार जुलैपर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड पाकिस्तानसोबत 10 ते 13 जुलैपर्यंत तीन वनडे आणि 16 ते 20 जुलैपर्यंत तीन टी-20 सामने खेळणार आहे.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा :

4 ते 8 ऑगस्ट – पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज
12 ते 16 ऑगस्ट – दुसरी कसोटी, लॉर्ड्स
25 ते 29 ऑगस्ट – तिसरी कसोटी, इमेराल्ड हेडिंग्ले
2 ते 6 सप्टेंबर – चौथी कसोटी, किया ओव्हल
10 ते 14 सप्टेंबर- पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड

Most Popular

error: Content is protected !!