Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाआष्टीत कोरोनाचा संसर्ग वाढला जिल्ह्यात १७६ बाधित

आष्टीत कोरोनाचा संसर्ग वाढला जिल्ह्यात १७६ बाधित


बीड (रिपोर्टर):- कोरोना रूग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. आज आलेल्या अहवालात आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. आष्टीत तब्बल ६३ जण बाधित आढळून आले आहेत तर जिल्ह्यात १७६ रूग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच एका तालुक्यात एवढे मोठे बाधित आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने काल बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ३ हजार ७८६ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी १२.३० वाजता प्राप्त झाला असून १७६ जण बाधित आढळून आले आहेत तर ३ हजार ६१० जण निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३, आष्टी ६३, बीड १३, धारूर ३, गेवराई २४, केज १४, माजलगाव ६, परळी ४, पाटोदा २८, शिरूर १५ आणि वडवणी तालुक्यात ३ रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!