घाटसावळी येथे रात्री घडली घटना
घाटसावळी (रिपोर्टर) एका 32 वर्षीय तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील घाटसावळी येथे रात्री घडली. कर्जाचा डोंगर कसा फेडावा? या चिंतेेतून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. दहा वर्षांपुर्वी त्याच्या मोठ्या भावानेही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.
बाळु रतन लांडे (वय 32 वर्षे, रा. घाटसावळी) या शेतकर्याने रात्री पावणे अकरा वाजता स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्री बारा वाजता घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सकाळी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळु लांडे याला दहा वर्षाचा एक मुलगा आणि आठ वर्षाची एक मुलगी आहे. त्याला दहा ते बारा एकर शेत असून कर्जबाजारी झाल्याने हे कर्ज कसे फेडावे ? या चिंतेतून त्याने आत्महत्या केली. दहा वर्षापूर्वी बाळु याच्या मोठ्या भावानेही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.