ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
बीड (रिपोर्टर) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा धरणाजवळ एका 25 वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह रात्री साडे दहा वाजता नागरिकांना आढळून आला. याबाबत बीड ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला.
रात्री साडेदहा वाजता पालीचे बिट अमलदार पी.टी.चव्हाण यांना रात्री साडेदहा वाजता एका हॉटेल चालकाने फोन करून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पालीच्या धरणासमोरील रोप वाटीकेच्या बाजुला एका 25 ते 30 वर्षाच्या युवकाचा मृतदेह असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता एका 25 वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. आज दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. मयत तरुणाच्या हातावर ‘अक्षय’ असे नाव गोंदलेले आहे. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. जर कोणाला या तरुणाबद्दल माहिती असेल तर त्यांनी बीड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे साबळे, रणखांब, आवारे, हवालदार पी.टी. चव्हाण, आनंद मस्के, अलगट, वरपे, कय्युम भाई यांनी भेट दिली.