Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडवडवणीओबीसीच्या राजकिय आरक्षणासाठी भाजपाचा वडवणीत दिड तास चक्काजाम

ओबीसीच्या राजकिय आरक्षणासाठी भाजपाचा वडवणीत दिड तास चक्काजाम


वडवणी (रिपोर्टर):- आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच,ओबीसी आरक्षणाचा विजय असो,तिघाडी सरकारचे करायचे काय खाली मुंडक वर पाय यासह अन्य घोषणा देत आज भाजपाचे वडवणी येथे जबरदस्त रस्तारोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.


राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे.या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व आरक्षण पूर्वत करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे व खा.डॉं.प्रितम मुंडे यांच्या आदेशाने भाजपा कार्यकर्त्यांनी आज सकाळी १० वा.वडवणी शहरातील बीड-परळी हायवे रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी तब्बल दिड तास चक्काजाम आंदोलन केले आहे.या आंदोलनामध्ये कार्यकत्यानी राज्यसरकारवर कडकडून टिका करत ओबीसी प्रवर्गाचे राजकिय आरक्षण आबाधित ठेवावे अशी मागणी केली आहे.या आंदोलनात ओबीस प्रवर्गातील सर्व घटकातील नेते, कार्यकर्ते, समाज बांधव सह अन्य सर्व समाजातील नेते गणांनी देखील उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.तर या मागणीचे निवेदन वडवणी तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!