Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईराज्य सरकारने ओबीसींवर सूड उगवला -आ. लक्ष्मण पवार

राज्य सरकारने ओबीसींवर सूड उगवला -आ. लक्ष्मण पवार


गेवराई (रिपोर्टर) ओबीसी समाजाच्या हाक्काचे आरक्षण महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळेच गेले असून, २०१० पासून हा विषय सुरू आहे. आरक्षण टिकावे म्हणून भाजपा सरकारकडून समर्थन केले. फडणवीस सरकारची भूमिका योग्य होती. हे राज्य सरकार ओबीसींवर अन्याय करणारे आहे. हे या आघाडी सरकारचे पाप आहे. दहा तारखा वाढवून दिल्या, तरीही या सरकारने काहीच केले नाही. समजून उमजून ओबीसींवर अन्याय करून, सुड उगविला असल्याचे मत आमदार लक्ष्मण पवार यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षण संदर्भात शनिवारी दि.२६ रोजी औरंगाबाद सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर भाजपाच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनात व्यक्त केले.

शनिवार ता. २६ रोजी सकाळी अकरा वाजता, आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली , झमझम पेट्रोल पंपा जवळच्या बायपास वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेद्र राक्षसभुवनकर, जेडी. शहा, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दादासाहेब गिरी, पवन गावडे, जि. प. सदस्य पांडुरंग थडके, प्रल्हाद माने,अरूण चाळक, पंचायत समितीचे सभापती दिपक सुरवसे, संदिप लग्गड, राजेद्र भंडारी, राहुल खंडागळे, याहिया खॉन , मधुकर वादे, जानमहमंद बागवान, ब्रम्हदेव धुरंधरे, देविदास फलके, महेश आहेर, नगरसेवक काशीनाथ पवार, मंजुर बागवान, संजय इगळे, मुन्ना सेंट, कृष्णा काकडे, राजेद्र आर्दड, धम्मपाल सौदरमल, बद्दोदीन, छगन आप्पा हादगुले, भगवानराव घुबार्डे, किशोर धोडलकर, अरूण मस्के, जानमहमंद बागवान, भरत गायकवाड, आप्पासाहेब कानगुडे, रावसाहेब काळे, शिवाजी शिगाडे, गौरव खरात, बाबा खराद, नवनाथ सौदलकर, राजु अष्टेकर, शेख मोहम्मद, गोपाल चव्हाण, सतिश चव्हाण, खदिर बागवान, मधुकर यादव लहू, संजय आंधळे,प्रा. श्याम कुंड, बंडू बारगजे , शे. जमादार, ज्ञानेश्वर खाडे, पप्पू खेडकर, उद्धव मडके, विनोद सौंदरमल, पुरुषोत्तम दाभाडे, विकास चौधरी, समाधान मस्के, शेषेराव तौर, खदीर बागवान, महेश सौंदरमल, करण जाधव, गोपाल चव्हाण, फहाग चाऊस, चव्हाण लक्ष्मण, बाबा खरात, मंजूर बागवान, राजेंद्र साळूंके, लतीफखा पठाण, शेख निजाम आदींची उपस्थिती होती. यावेळी आंदोलन करण्याचा मार्गदर्शन करताना आमदार पवार म्हणाले की,महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना ओबीसी आरक्षण सबधी एक अधिसूचना काढण्यात आली होती. ओबीसीचे आरक्षण का देणे आवश्यक अशा पध्दतीने बाजू माडण्यास सरकार कमी पडले आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाचे हाक्काचे आरक्षण रद्द झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचे ते शेवटी बोलताना म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!