Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीधसांचे आष्टीत तर धोंडेंचा धामणगाव येथे चक्का जाम

धसांचे आष्टीत तर धोंडेंचा धामणगाव येथे चक्का जाम


आष्टी ( रिपोर्टर ) :-स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून ओबीसी समाज आक्रमक होऊन आरक्षण पूर्ववत करा या मागणीसाठी आता भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन
होत आहे.

या आंदोलनात ओबीसी समाज एकवटला असून मा.मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आ. सुरेश धस यांचे आष्टीत तर मा. आ.भिमसेन धोंडे यांचे धामणगांव येथे चक्का जाम आंदोलनास ओबीसी समाज आक्रमक पाहायला मिळाला आष्टीत आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानापासून सुरवात झाली आ.धस आजारी असताना चालता येते नसतानाही देखील वॉकर घेऊन पायी चालत चक्का जाम आंदोलनात खडकत चौकापर्यंत पोहचवून खडकत चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला यावेळी समाजसेवक विजय गोल्हार , पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप, आदिनाथ सानप, अनिल ढोबळे, रमजान तांबोळी, यशवंत खंडागळे, सादिक कुरेशी, नवनाथ नागरगोजे, परिवंत गायकवाड,केशव बांगर,बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी घुले, ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर मा.मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मा. आ.भिमसेन धोंडे यांचे धामणगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन चक्का जाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली मोठ्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित होता.यावेळी युवा नेते अजय धोंडे,वाल्मिक निकाळजे,हनुमंत थोरवे, अमोल तरटे, रघुनाथ शिंदे, संतोष चव्हाण,अमोल चौधरी,अशोक साळवे,सतिष झगडे, सरपंच शितल चौधरी,बबनराव झांबरे, सावता ससाणे, शैलजा गर्जे,सुरेखा केरुळकर,दैवशाला शिरोळे, तात्यासाहेब कदम, संदिप नागरगोजे, सुनिल सुर्यवंशी,युवराज वायबसे,दादासाहेब जगताप,तुषार काळे, भाऊसाहेब धोंडे,सुरेश दिंडे,युवराज कटके,मोठ्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित होता.

ओबीसी समाजावर अन्याय आहे. आरक्षण कायम ठेवा अन्यथा

आक्रमक आंदोलने होतील – मा. आ. भीमसेन धोंडे
राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकिय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात राजकिय आरक्षणा प्रमाणे शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता आहे.ओबीसी समाजावर अन्याय आहे.आरक्षण कायम ठेवावे अन्यथा ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरून उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही.

आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला – आ. धस
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण आघाडी सरकारने केलेल्या नाकरते पणामुळे न्यायालयाने बाद केले आहे. दिनदुबळे, वंचित , ओबीसी, कष्टक-यांचे काही देणे लागत नसुन त्यांना फक्त स्वत:च्या तुमड्या भरण्याचे काम करत आहे. मागासवर्गीयांचे नोकरीतील पदोन्नती रद्द करणे यासारखे निर्णय घेतला आहे. हा एका प्रकारचा अन्याय आहे. ओबीसी चा आरक्षण पूर्ववत करा अन्यथा समाजात उद्रेक झाल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!