बीड (रिपोर्टर) सासरच्या जाचाला कंटाळून एका 24 वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.
पुजा सोनाजी गायकवाड (रा. मोरवड ता. वडवणी) या महिलेने चार दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान या महिलेचा रात्री मृत्यू झाला. सासरच्या जाचास कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.