Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडशेतीच्या वादातून शेतकर्‍यावर कुर्‍हाडीने हल्ला नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून शेतकर्‍यावर कुर्‍हाडीने हल्ला नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- पिंपळवाडी येथील शेतकर्‍याला शेतीच्या वादातून कुर्‍हाडीने मारहाण करत दोघांनी गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली असून या प्रकरणी शेतकर्‍याच्या फिर्यादीवरून पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पिंपळवाडी येथील जगन्नाथ एकनाथ बहिरवाळ (वय 70) यांची पिंपळवाडी येथे शेती आहे. त्या शेतीचे ऊस त्यांनी त्यांच्या जनावरांना टाकला. मात्र त्यांचा पुतण्या कृष्णा कान्हू बहिरवाळ आणि केशव यांनी आता हे शेत आम्हाला देत तू ऊस तोडू नको, असे म्हणून कुर्‍हाड, दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. शेतकर्‍याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नेकनूर पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात येऊन जगताप यांची तक्रार नोंदवत मारहाण करणार्‍या पुतण्या कृष्णा आणि केशव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!