Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री असलेल्या नांदेडमध्ये रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत...

धनंजय मुंडे पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री असलेल्या नांदेडमध्ये रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत गर्दीच गर्दी


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत धनंजय मुंडेंच्या लोकप्रियतेची पुन्हा चमकतेय झळाळी!

नांदेड (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे कोरोनाचा विळखा कमी होताच पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आलेले दिसत आहेत. सध्या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या समवेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत मराठवाडा दौरा करत आहेत.

207750973 246131236887592 546351537673053869 n


गेल्या तीन-चार दिवसात उस्मानाबाद, लातूर व त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यात ही परिवार संवाद यात्रा पोचली आहे. या यात्रेत धनंजय मुंडे यांच्या लोकप्रियतेची झळाळी पुन्हा चमकताना दिसत आहे. जिथे जाईल तिथे स्वागत, भेटायला येणार्‍या तरुणाईची गर्दी अगदी सकाळी 8 वाजल्यापासून रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत दिसत असून, नेहमीप्रमाणे गर्दीच्या गराड्यात, ’ये लाव रे तो फोन…’ म्हणत सामान्यांची कामे मार्गी लावताना धनंजय मुंडे पुन्हा दिसत आहेत. उस्मानाबाद, लातूर याठिकाणी विविध मतदारसंघातील पक्षाच्या आढावा बैठकीत ना. मुंडेंनी पक्ष संघटन वाढीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विरोधी पक्षांविरुद्ध नेहमीच्या शैलीत जोरदार बॅटिंग देखील केली. नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्याचे संपर्कमंत्री या नात्याने धनंजय मुंडे आज नांदेड जिल्ह्यात दौरा करत आहेत. या ठिकाणी देखील वेगवेगळ्या भागातून कामे घेऊन आलेल्या महिला, विद्यार्थिनी, तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या गराड्यात धनंजय मुंडे दिसत आहेत. आलेल्या प्रत्येकाचे समाधान होईपर्यंत वेळ देऊन त्यांचे काम तिथल्या तिथेच मार्गी लावायची मुंडेंची नेहमीची पद्धत, भेटायला आलेल्यांना पण समाधान देऊन जाताना पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!