Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमपंढरपूरहून मोटारसायकल चोरणारा नाळवंडीत जेरबंद केला

पंढरपूरहून मोटारसायकल चोरणारा नाळवंडीत जेरबंद केला

बीड (रिपोर्टर)- पंढरपूर शहरामधून एकाने मोटारसायकल चोरली होती. या प्रकरणी त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील गुन्हेगार नाळवंडी येथील असल्याची माहिती बीड पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्यास जेरबंद केले आहे.
काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथून एम.एच. १३ सी.एफ. ८३९५ या क्रमांकांची गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणी तेथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरटा विकास अशोक कानडे हा नाळवंडी येथे असल्याची माहिती बीड पोलिसांना झाल्यानंतर पीआय ठोंबरे, पीएसआय तुपे, शेजुळ, सुरवसे, कागदे, गायकवाड यांनी त्यास ताब्यात घेतले.

Most Popular

error: Content is protected !!