Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी दिर्घ मुदतीच्या रजेवर

जिल्हाधिकारी दिर्घ मुदतीच्या रजेवर

बीड (रिपोर्टर):- महसुल विभागामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार (महसुल) यांचे अनेक पदे रिक्त आहेत. एका-एका उपजिल्हा धिकार्‍याकडे तीन-तीन विभागांचा पदभार रिक्त असतानाही जिल्हा परिषदेचे सर्वेसर्वा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे ४ जुलैपासून दिर्घ मुदतीच्या रजेवर जात आहेत.

जिल्हाधिकारी जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये आरोग्य प्रशासन ढेपाळलेले होते. त्यातच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी खरीप हंगाम संदर्भातील बैठकीत सर्व शासकीय अधिकार्‍यांसमोर जिल्हाधिकार्‍यांचे वाभाडे काढले होते. यातच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप खाजगी कारण देत तब्बल महिनाभराच्या रजेवर जात असल्याने पुन्हा एकदा जिल्ह्याचा सर्वच कारभार प्रभारी अधिकार्‍यावर येऊन ठेपणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!