Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईममाजलगाव ग्रामीण पोलिसांच्या सावधगिरी मुळे मोठा अनर्थ टळला

माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या सावधगिरी मुळे मोठा अनर्थ टळला


पोलीस आणि दरोडेखोर यांचा फिल्म स्टाईलने दिडतास पाठलागाचा खेळ रंगला 

सशस्त्र सह बोलेरो केली जप्त

माजलगाव (रिपोर्टर):- माजलगाव गेवराई राष्ट्रीय महामार्गावर   गाड्या तपासणी करीत असताना संशय आलेल्या बोलेरो गाडी चा पाठलाग करत असलेली बोलेरोत दरोडेखोर होते  त्यांनी सदरगाडी फिल्मी स्टाईल ने पळवली अन खेळ दिडतास चालला अखेर दरोडेखोर पसार होण्यास यशस्वी झाले .मात्र ग्रामीण पोलीस साच्या सावधगिरी मुळे मोठा अनर्थ टळला आहे ही घटना दि.२६ जुन रोजी सांयकाळी ७ ते ८ च्या दरम्यान घडली आहे आणि सदरील बोलेरो गाडी शस्त्रा सह  जप्त केली आहे.     
     या बाबत अधिक माहिती अशी कि माजलगाव तालुक्यातील वारोळा येथून एका ऊस तोड मंजुरास मुकादमाने बोलेरो गाडी घालून गेले आहेत ही बातमी गुप्त बातमी दाराने ग्रामीण पोलिसांना मोबाईल वर दिली आणि ग्रामीण पोलिसांनी तातडीने केसापुरी कँम्प येथील सादोळा चौकात गाड्या तपासणी मोहीम सुरु केली आणि गाड्या तपासणी सुरू असताना च समोरून संशयित बोलेरो गाडी क्र.एम .एच.१४ सी.एस.३९१५ हीने पोलिसांना गुंगारा देवुन गाडी पळवली सदर गाडी राष्ट्रीय महामार्गहुन  देवखेडा गावातून भरधाव चालवत एका म्हशीला धक्का देवुन सदरगाडी सिंधफना नदीच्या पुलावरून सैलानी बाबा च्या रोडने पळवली सदर दरोडेखोर आणि पोलीस यांच्या पाठलागाच फिल्मी स्टाईल ने एक ते दीड तास चालना आणि दरोडेखोर नी पोलिसांना चकवा देवुन गाडी सैलानी बाबा च्या जवळील  पांदण रस्त्या मध्ये गाडी घालून गाडी सोडून दरोडेखोर पसार होण्यास यशस्वी झाले .पोलीस रिकाम्या हाताने परत आले आणि दि.२७ जुन रोजी सैलानी बाबा जवळ बोलेरो जीप आहे असे पोलिसांना मोबाईल वर सांगितले तर काल दि.२६ जुन रोजी आपणच पाठलाग केली बोलेरो गाडी असल्याचे निदर्शनास आले सदरगाडी ची झडती घेतली असता सदरगाडी त तलवार, चाकु,सतुर अशी धारदार ८ शस्त्र  लाल चटणी, मीठाचे पुडे,८ ते १० बंद मोबाईल सह बोलेरो जीप जप्त केली आहे.सदर कार्यवाही पो.नि.संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.निलेश ईधाटे,पो.हे.काँ.विठ्ठल राठोड, पो.काँ.विलास खराडे पाटील, पो.काँ.गोंविद बाबरे,पो.काँ.भिसे यांनी केली आहे.  ग्रामीण पोलिसांच्या सावधगिरी आणि तत्परता मुळे मोठा अनर्थ टळल्याने पोलिसांच्या कार्यवाही चे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!