Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाआष्टी,पाटोद्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आज १२९ पॉझिटिव्ह

आष्टी,पाटोद्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आज १२९ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत असतांनाच आष्टी, पाटोद्यात रूग्ण संख्या वाढू लागली आहे. आज आलेल्या अहवालात आष्टी तालुक्यात ३० तर पाटोद्यात ३६ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात १२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य विभागाने काल दिवसभर घेतलेल्या कोरोना संशयितांच्या स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ३ हजार ४९७ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. ३ हजार ६२६ जणांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात १२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ५, आष्टी ३०, बीड ८, धारूर १४, गेवराई १०, केज ४, माजलगाव ४, परळी ५, पाटोदा ३६, वडवणी ५ आणि शिरूर तालुक्यात ८ रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!