Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeबीडदारू घेऊन जाणारा ट्रक नेकनूर रोडवर पलटला

दारू घेऊन जाणारा ट्रक नेकनूर रोडवर पलटला

नेकनूर (रिपोर्टर)- विदेशी दारू घेऊन जाणार्‍या ट्रकच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना पहाटे साडेपाच वाजता मांजरसुंबा-नेकनूर रोडवरील सिंहगड धाब्याजवळ घडली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.
विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम.एच. १५ सीके १५५५) चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे साडेपाच वाजता पलटी झाला. ट्रकमधील दारूचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. विदेशी दारू घेऊन हा ट्रक नाशिकवरून लातूरकडे जात होता.

Most Popular

error: Content is protected !!