Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमबंगाली डॉक्टराच्या उपचाराने ऊसतोड मजूराचा मृत्यू, मृतदेह दवाखान्यासमोर ठेवला

बंगाली डॉक्टराच्या उपचाराने ऊसतोड मजूराचा मृत्यू, मृतदेह दवाखान्यासमोर ठेवला


धारुर (रिपोर्टर)ः- उपचारासाठी गेलेल्या एका ४८ वर्षीय मजूरांवर बंगाली डॉक्टराने उपचार केल्यानंतर सदरील मजूर मरण पावल्याची घटना अंबेवडगांव येथे घडली. दोषी डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी मृतदेह दवाखान्यासमोर ठेवण्यात आलेला होता. दुपारपर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.
गावंदरा येथील रावसाहेब अंकुशे हे उपचारासाठी अंबेवडगांव येथील बंगाली डॉक्टर विश्‍वास यांच्याकडे गेले होते.

सदरील डॉक्टराने त्यांना इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. या बोगस डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मृतदेह दवाखान्यासमोर ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालेले नव्हते. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डकले यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाल्या सिएस सी संपर्क साधून माहिती घेते. हा डॉक्टर गेल्या काही दिवसापासून उपचार करत आहे. त्याच्याकडे कसल्याही प्रकारची डिग्री नसल्याचे सांगण्यात आले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!