Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराईत तहसीलदारच्या पथकाची अवैध वाळूवर कारवाई

गेवराईत तहसीलदारच्या पथकाची अवैध वाळूवर कारवाई


गेवराई (रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्यातील गोदा पात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच असून याबाबत तहसिलदार सचिन खाडे यांनी पथकाची स्थापना करुन कारवाया सुरू केली असून यामध्ये काल रात्री त्याच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला असून गेवराई पोलीसांच्या स्वाधीन केला.


गेवराईतील वाळू उपसा प्रकरणी आ.लक्ष्मण पवार यांनी लक्ष घातल्याने येथील वाळू उपसा टिप्परने बंद करण्यात आला. त्यामुळे वाळूचा अवैध उपसा आणि त्याची चोरटी वाहतूक करण्यासाठी ट्रकचा वापर मोठ्या प्रमाणात होवू लागला आहे. तहसिलदार सचिन खाडे यांनी वाळू माफीयांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.काल तलवाडा येथे ट्रक क्रमांक एम.एच.१६.क्यु. ७७९७ मधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळताच पथक प्रमुख रामदासी, तलाठी तरवरे, गायकवाड, पांढरे,पांचाळ, सत्तार मामू व दोन पोलीस कर्मचार्‍यांनी ट्रकचा पाठलाग करुन तलवाडा फाटा येथे पकडून ती गेवराई पोलीस ठाण्यात लावली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!