Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावमराठा आरक्षणासाठी आडसकरांचे धरणे आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आडसकरांचे धरणे आंदोलन

माजलगाव (रिपोर्टर):- मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी भाजपाचे रमेश आडसकर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी दिलेले आरक्षण रद्द झाले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणप्रश्‍नी योग्य बाजु न मांडल्यामुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी आडसकरांनी करत असंख्य कार्यकर्त्यासह आज एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन महसूल उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आहे. या त्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता युवा मोर्चाचे मनोज जगताप, भजापाचे माजी तालुकाध्यक्ष अरूण राऊत, दिपक मेंडके, बबन सोळंके, माजी नगराध्यक्ष तिडके आदी भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


जगताप, नाईकनवरेंची अनुपस्थिती
माजलगाव येथेही भाजपाकडे दोन गट असून भाजपाचे मोहन जगताप आणि नितीन नाईकनवरे यांनी आडकरांच्या धरणे आंदोलनाला अनुपस्थिती दाखवून दिली आहे. त्यातून या ठिकाणी भाजपात खदखद असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!