बीड (रिपोर्टर) चुलत दिराने एका 23 वर्षीय विवाहितेला आमिष दाखवून दीड वर्षापासून अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील देऊळगाव घाट येथील 23 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या चुलत दिराविरुद्ध कलम 376, 354, 504, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 30 नोव्हेंबर 2021 रोजी व त्यापूर्वी चुलत दिराने आमिष दाखवून नगर येथे नेले व तेथे अत्याचार केला. त्यानंतर गावीही अत्याचार केला. या प्रकरणी चुलत दिरावर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो अंभोरा पोलिसात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे सपोनि. कोळेकर हे करत आहेत.