Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडखालसा प्रकरणी वक्फबोर्ड हरकतमध्ये, भु माफियांचे धाबे दणाणले

खालसा प्रकरणी वक्फबोर्ड हरकतमध्ये, भु माफियांचे धाबे दणाणले

औरंगाबादेत वक्फ बोर्डाची महत्त्वपुर्ण बैठक, पुढील आठवड्यात वक्फ बोर्डाची कमिटी बीड जिल्ह्यात

वक्फ बोर्ड आपल्यादारी म्हणत सर्व प्रश्‍न जागच्याजागी सोडवणार; बोगस खालसा करून जमीन विक्री करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करणार, वक्फ बोर्डाने घेतली सायं.दै.बीड रिपोर्टरची दखल, जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वक्फ बोर्डाचे सर्व प्रश्‍न जोपयर्ंत सुटत नाहीत तोपर्यंत कमिटी जिल्ह्यात हलणार नाही

बीड (रिपोर्टर):- वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या जमिनी अवैधरित्या विक्री करत भुमाफिये आपले खिसे कसे भरतात ज्याची पोलखोल गेल्या दोन महिन्याच्या कालखंडात सायं.दै.बीड रिपोर्टरने केल्यानंतर याची गंभीर दखल वक्फ बोर्डाने वरच्या पातळीवर घेत फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेत महत्त्वपूर्ण बैठक घेत राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत ‘वक्फ बोर्ड आपल्यादारी’ म्हणत जमिनीच्या रजिस्ट्रेशनसह चेंज रिपोर्ट, अतिक्रमण विषय, सुनावण्या, खालसा, हक्काचे प्रश्‍न, जमिन विक्रीचा विषय यासह वक्फ बोर्डाबाबतच्या अन्य लहाण्यातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या विषयाची तपासणी, चाचणी करत जिथल्या तिथे निकाल देण्यासाठी ही वक्फ बोर्डाची कमिटी सर्व प्रथम बीड जिल्ह्यात येत असून वक्फ बोर्डाच्या जमिनी विक्री करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करणार असल्याने भु माफियात प्रचंड खळबळ उडाली आहे. येत्या आठवडाभरात ही कमिटी बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत असून वक्फ बोर्डाचे सर्व प्रश्‍न जोपर्यंत निकाली निघत नाहीत तोपर्यंत ही समिती बीडमध्येच तळ ठोकून राहणार आहे.

बीड जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करत अवैधरित्या खालसा करून विक्री करणे यासारखे अनेक प्रकार घडल्याच्या तक्रारी सायं.दै.बीड रिपोर्टरकडे आल्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या जमिनीविषयी रिपोर्टर सत्यता प्रकाशित करत आहेत. पुराव्यानिशी ग्राऊंडवर जावून रिपोर्टर जमिनीतला गैर व्यवहार समोर आणत आहे. याची गंभीर दखल वक्फ बोर्डाने घेतली आणि २५ व २६ जून रोजी औरंगाबादेत वक्फ बोर्डाच्या संदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्या फौजिया खान या होत्या. यावेळी माजी आ.एम.ए.शेख, खा.इम्तियाज जलील,मुद्दसर लांबे, ऍड.ए.यु.पठाण, आ.वजाहद मिर्झा आणि वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणाबाबत चर्चा झाली. प्रामुख्याने रिपोर्टरने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर वक्फ बोर्डाने बीड जिल्ह्याचीच नव्हे तर राज्यभरातील जमिन गैरव्यवहार प्रकरणे शोधण्यास सुरू केले. त्यासाठी वक्फ बोर्डाचे सदस्य स्वत:हून प्रत्येक जिल्ह्यात जात वक्फ बोर्ड आपल्यादारी म्हणत तेथील लोकांच्या अडीअडचणी सोडवणार आहेत. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भु माफियांनी कांड केल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्व प्रथम ही कमिटी येत्या आठवड्यात बीड जिल्ह्यात येणार आहे. येथे आल्यानंतर सर्व प्रथम जिल्हाधिकार्‍यांशी बैठक घेतील, त्यांना सोबत घेवून जिथे अपहार झाला आहे त्या घटनास्थळीही जातील. विशेष म्हणजे वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत रजिस्ट्रेशन असेल, चेंज रिपोर्टर असेल, स्कीम, अतिक्रमण, सुनावणी, बोगस खालसा, हक्काचे प्रश्‍न, जमिनी विक्री यासह सर्व प्रश्‍नावर जिथल्या तिथे निकाल देण्यत येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यांचे प्रश्‍न सुटणार आहेत. परंतू ज्या लोकांनी यात भ्रष्टाचार केला आहे ते मात्र यात गुतणार आहे. बोगस खालसा करून जमिनी विक्री करणार्‍यावर ही कमिटी त्याच क्षणी एफआयआर दाखल करणार आहे. वक्फ बोर्डाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील भु माफियांचे धाबे दणाणले आहेत.

पाय पोटाकडेच वळतात

sm shekh

कोणी कितीही मोठा झाला, व्यवसायासाठी अन्य कारणासाठी गाव सोडून गेला तरी तो आपल्या गावाशी, जिल्ह्याशी नाळ जोडून असतो. माजी आ.एम.एम.शेख हे बीड जिल्ह्यातले आहेत. रिपोर्टरने जेंव्हा वक्फ बोर्डाच्या जमिनीतील अपहाराचे कांड दोन महिन्यापासून प्रकाश झोतात आणले आणि यामध्ये भु माफिये कसे आपले उखळ पांढरे करतात व सर्वसामान्य मुस्लिम समाजाला न्याय कसा मिळत नाही हे दाखवून दिले तेंव्हा एम.एम.शेख यांनी त्याची दखल घेतली आणि वक्फ बोर्डाची बैठक औरंगाबादेत घेवून बीडचे वक्फ बोर्डाचे सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी विक्री करून भ्रष्टाचार करणार्‍यांच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी माजी आ.एम.एम.शेख यांनी ठोस पाऊले उचलली. कितीही केलं तरी पाय पोटाकडे वळतात. आपल्याला जन्म दिलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांना त्रास होत असेल आणि मुठभर भ्रष्टाचारी वक्फ बोर्डाच्या जमिनी बोगस खालसा करून विक्री करत असतील तर ते खपवुन घेणार नाही या भूमिकेत एम.एम.शेख दिसून आले.
बोगस खालसा करणार्‍यांवर गुन्हे दाखल होणार
बोगस खालसा करून जमिनी विक्री करणार्‍या भु माफियांविरोधात वक्फ बोर्ड आक्रमक झाले आहे. औरगंाबादेत बैठक घेतल्यानंतर सर्व प्रथम बीड जिल्ह्यातली घाण साफ करण्याइरादे ही कमिटी बीडमध्ये येणार असून ज्या ठिकाणी बोगस खालसा करून जमिनी विक्री झाल्या आहेत त्या ठिकाणी भु माफियांवर त्याच क्षणी एफआयआर वक्फ बोर्डाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल होणार आहे याची कुणकुण भु माफियांना लागल्याने त्यांच्या तंबुत घबराहट पसरली आहे.

Most Popular

error: Content is protected !!