Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमगेवराईत दोन गटात तलवारबाजी; दोघे गंभीर जखमी

गेवराईत दोन गटात तलवारबाजी; दोघे गंभीर जखमी


गेवराई (रिपोर्टर)- आर्थिक देवाणघेवाणीवरून रात्री साडेअकरा वाजता दोन गटात तलवारबाजी झाल्याने यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एकावर बीडमध्ये तर दुसर्‍यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून दुपारी १ वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.
गेवराई शहरातील तागडगाव रोडवर रात्री साडेअकरा वाजता दिनेश कानडे व शरद ठोंबरे यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीतून भांडण झाले. यामध्ये तलवारबाजी झाली असून दोघेही गंभीर जखमी झाले. यापैकी दिनेश कानडे याला औरंगाबाद येथे तर शरद ठोंबरे याला बीडमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच ठाणेप्रमुख पुरुषोत्तम चोभे, पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेत दुपारी १ वाजेपर्यंत ठाण्यात दोन्ही गटातील कोणीच फिर्याद देण्यासाठी आले नसल्याने घटनेची नोंद ठाण्यात झाली नाही.

Most Popular

error: Content is protected !!