Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमलिंबागणेश खून प्रकरणात तिघांना ठोकल्या बेड्या

लिंबागणेश खून प्रकरणात तिघांना ठोकल्या बेड्या


नेकनूर (रिपोर्टर):-लिंबागणेश येथील 25 वर्षीय तरुणाचा खून करून अपघात भासवण्यासाठी मांजरसुंबा घाटात मृतदेह फेकला होता. या प्रकरणाचा नेकनूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मुख्य आरोपी मयताचा जवळचा नातेवाईक असल्याचे समजते.
काल रात्री लिंबागणेश येथील निलेश शहादेव ढास (वय 25) या युवकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. तो खून अपघात भासवण्यासाठी आरोपींनी मयताच्या दुचाकीसह मृतदेह मांजरसुंबा घाटात फेकला होता. घटनास्थळी नेकनूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांनी भेट दिल्यानंतर तो अपघात नसून खून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. काल दुपारी पोलीसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. रात्री 11:30 च्या दरम्यान यातील मुख्य आरोपी मनोज घोडके (वय 30) रा.घोडका राजुरी, कृष्णा डोके (वय 27) रा.काठोडा आणि राजकुमार यादव (वय 21)रा.वांगी यांना अटक करण्यात आली. त्यानीं पोलीसांना खूनाची कबूली दिली आहे. आज तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!