Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडखा.संभाजीराजे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी ‘आरक्षण जनसंवाद’

खा.संभाजीराजे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी ‘आरक्षण जनसंवाद’


बीड (रिपोर्टर):- मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलन होत आहे. खा.संभाजी राजे हे 2 जुलै रोजी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून बीडमध्ये आरक्षण जनसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
आरक्षण जनसंवादच्या कार्यक्रमानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी खा.संभाजीराजे भोसले यांच्या दौर्‍याबद्दल माहिती दिली. या पत्रकार परिषदेला माजी आ.राजेंद्र जगताप, अशोक हिंगे, बी.बी.जाधव, गंगाधर काळकुटे, सुनिल सुरवसे, नगरसेवक रमेश चव्हाण, संतोष जाधव, जावेद कुरेशी, अशोक सुखवसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना अशोक हिंगे म्हणाले की, दि.2 जुलै रोजी खा.संभाजीराजे हे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. ते अहमदनगरवरून आष्टी येथे दुपारी 12.30 वाजता येणार आहे. दुपारी 1 वाजता जामखेड येथे तर 2.30 वाजता पाटोदा येथे, 3.30 वाजता पिट्टी नायगाव, मुर्शदपुर फाटा या ठिकाणी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 5 वाजता बीड येथे आगमन होणार असून 5.30 वाजता समर्थ लॉन्स या ठिकाणी आरक्षण जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 3 जुलै रोजी 9 वाजता पाडळसिंगी, 9.45 वाजता गढी कारखान, 10 वाजता गेवराई व त्यानंतर औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षण जनसंवाद होत असल्याची माहिती हिंगे यांनी दिली आहे. संभाजीराजे सर्वस्तरातील लोकांची संवाद साधुन परिस्थिती जाणुन घेणार आहेत असे अशोक हिंगे यांनी म्हटले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!