Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडअपघात रोखण्यासाठी महामार्गावर गतीरोधक बसवा, लिंबागणेशचे नागरीक उतरले रस्त्यावर

अपघात रोखण्यासाठी महामार्गावर गतीरोधक बसवा, लिंबागणेशचे नागरीक उतरले रस्त्यावर


बीड (रिपोर्टर):- मांजरसुंबा-पाटोदा या राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत अनेकांचा अपघातामुळे बळी गेला असून गतीरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आज गावकरी रस्त्यावर उतरले होते. डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.
मांजरसुंबा-पाटोदा दरम्यान मोरगाव फाटा, मौजे मुळूक बसस्थानक, लिंबागणेश बसस्थानक, भालचंद्र माध्यमिक विद्यालय, वैद्यकिन्ही बसस्थानक या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी डॉ.ढवळे यांच्यासह लिंबागणेश येथील नागरीकांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी रस्त्यावर उतरून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.गणेश ढवळे, गणेश मोरे, रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे, अशोक जाधव, कृष्णा पितळे, सचिन ढास, विक्की वाणी, संतोष वाणी, अभिजीत गायकवाड, अशोक वाणी, अमोल जाधव, अक्षय वायभट, दिनेश वायभट, नवनाथ येडे, ओम क्षीरसागर, सचिन ढास, दत्तात्रय ढवळे सह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!