Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडबीड तहसीलदार वमनेंच्या उपस्थितीत नायब तहसीलदार,पेशकार यांच्यात बाचाबाची,व्हिडीओ व्हायरल

बीड तहसीलदार वमनेंच्या उपस्थितीत नायब तहसीलदार,पेशकार यांच्यात बाचाबाची,व्हिडीओ व्हायरल

वाळू,मुरूमाच्या गाड्यावरून सुरू होता वाद; व्हिडीओ व्हायरल, तहसीलदारांनी व्हिडीओ काढणार्‍यांना दाखवला हात
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात अवैध वाळू व मुरूम उपशाचे प्रकरण सातत्याने गाजते. महसूल विभाग यामुळे पुर्णत: बदनाम झाल्याचे अनेक वेळा दिसून आल्यानंतर आज नायब तहसीलदार डोके यांच्या टेबलजवळ पेशकार नागरगोजे आणि डोके यांच्यात जोरदार वाद सुरू होता. यावेळी विशेषत: दस्तुरखुद्द तहसीलदार वमने त्याठिकाणी उपस्थित होते. तहसीलमध्ये या बेशिस्तपणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तहसीलदार वमने स्वत:हून व्हिडीओ काढणार्‍याच्या दिशेने येत मज्जाव करतांना दिसून आले आहेत.


आज बीड तहसीलमधील नायब तहसीलदार डोके यांच्या टेबलजवळ पेशकार नागरगोजे हे डोके यांना बोलतांना दिसून येत आहेत. ही कामाची पद्धत नसल्याचे सांगत दोघे एकमेकांवर आक्रमक होत शाब्दिक चकमक करतांना दिसून आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी तहसीलदार वमने हे खिशात हात घालून टेबलजवळ उभे असल्याचे दिसून येते. जेंव्हा तहसीलदारांच्या लक्षात आले. बाहेर खिडकीतून कोणी तरी व्हिडीओ काढतय त्यावेळी तहसीलदार हसत मुखाने खिडकीकडे येत व्हिडीओ काढणार्‍या व्यक्तीला व्हिडीओ काढण्यापासून मज्जाव करतांना त्या व्हिडीओमध्ये दिसते. अवैध वाळू उपसा प्रकरणात महसूल विभाग आपले हात ओले करतांना प्रत्येकवेळा दिसून आले आहेत. तहसीलदार वमने यांच्या विरोधातही अनेक वेळा आरोप झाले आहेत. बीडचे तहसील केवळ वाळू माफियांच्या आणि रेशन माफियांच्या हप्तेखोरीसाठी आहे की काय? अशी चर्चा होत असून आजच्या या पेशकार आणि नायब तहसीलदारांच्या वादाचा व्हिडीओही तेवढाच चर्चेचा झाला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!