Friday, October 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमहागाईचा भडका! घरगुती गॅस 25 रूपयांनी महागला पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ गॅस दरवाढीने सर्वसामान्य...

महागाईचा भडका! घरगुती गॅस 25 रूपयांनी महागला पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ गॅस दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीस


बीड/मुंबई (रिपोर्टर):- कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडले. सर्वसामान्यांचे व्यवसाय मोडकळीस आले. लोकांचा आर्थिकस्तर घसरला अशा भयावह परिस्थितीत दिवसेंदिवस इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणावर होत असून आज सरकारी इंधन कंपन्यांनी विना अनुदानीत सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 25 रूपये 50 पैशाने वाढ केली तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमागे 86 रूपयाने वाढ झाल्याने सर्वसामान्यांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे बजेट पुर्णत: ढासळले आहेत. आजयर्पंत 835 रूपयांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर आता 860 रूपये 50 पैशांना झाला असून सुत्रांच्या माहितीनुसार ही दरवाढ येत्या काही महिन्यात सुरूच राहणार आहे. ऑक्टोबरमध्ये अंदाजे घरगुती गॅसची किंमत 1250 रूपयांपर्यंत जाण्याचे शक्यता आहे.
अच्छे दिनची गुहार देणार्‍या देशातील मोदी सरकारने इंधनावर प्रचंड कर लावल्यानंतर आणि रोज होणार्‍या भाववाढीनंतर पेट्रोलने शंभरी केंव्हाच पार केली आहे तर डिझेल प्रतिलीटर शंभर रूपयाच्या आसपास जावून पोहचले आहे. पेट्रोल-डिझेलची रोज दरवाढ होत असतांना आज घरगुती गॅस सिलेंडरमध्येही प्रचंड दरवाढ झाली आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी विना अनुदानीत सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 25 रूपये 50 पैशाने वाढ केली आहे तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमागे 86 रूपये वाढले आहेत. त्यामुळे आता 835 रूपयाला मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर 860 रूपये 50 पैशाला मिळणार आहे. इंधन दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडाला असून पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचा फटका अन्य साधनांवरही होत असल्याने सर्वसामान्यांच्या घरातल्या किचनमधील बजेट पुर्णपणे ढासळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेत आल्यानंतरं  पेट्रोल के भाव कम हुये की नही म्हणत स्वत:च्या पायगुणाचे दाखले देत स्वत:ची पाठ थोपटुन घेतली होती. आता सात वर्षे सत्तेत राहिल्यानंतर त्याच पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगणचुंबी होत असतांना आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातली आणि राज्यातली भाजप या प्रश्‍नी दुर्लक्ष करत सर्वसामान्यांना वार्‍यावर सोडतांना दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!