Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमअज्ञात चोरट्याने युवकाचा गळा चिरला घटनास्थळी पोलिसांची धाव; बाभळगाव येथील प्रकरण

अज्ञात चोरट्याने युवकाचा गळा चिरला घटनास्थळी पोलिसांची धाव; बाभळगाव येथील प्रकरण


बीड (रिपोर्टर):-रात्री गोठ्यावर मुक्कामाला असलेल्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने युवकाशी झटापटी करत तीक्ष्ण हत्याराने गळा चिरला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून घटनास्थळी दिंद्रुड पोलीसांनी धाव घेतली असून हा प्रकार माजलगाव तालुक्यातील बाभळगाव या ठिकाणी घडला.


गावा शेजारी असलेल्या गोठ्यावर मारुती नारायण गाडेकर आणि विलास नारायण गाडेकर हे दोन सख्खे भाऊ मुक्कामाला असतात. रात्री दोनच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने शिरले. सुुरुवातीला चोरट्यांनी विलासला धमकावत धक्काबुक्की केली. त्यात मधे पडत मारुती (वय १६) याने चोरट्याला दगड मारला. चोरट्याने दगड चुकवत स्वत: जवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने मारुतीचा गळा चिरला. आरडाओरड झाल्यानंतर गावकरी घटनास्थळी धावले. गावकरी येताच चोरट्याने गुप्ती आणि इतर हत्यार जागीच टाकत दुचाकीवरून पळ काढला. आज सकाळी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निगरीक्षक श्रीमती पुंडगे यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन गुप्ती आणि इतर साहित्य जप्त केले. पोलीस निरीक्षकांचे एक पथक गंभीर असलेल्या युवकाचा जवाब नोंदविण्यासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!