Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रकार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा सोलापूर प्रशासनाचा प्रस्ताव

कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा सोलापूर प्रशासनाचा प्रस्ताव

काही वारकरी संघटनांचा विरोध
पंढरपूर (रिपोर्टर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक करावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. बाहेरुन येणार्‍या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नको, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. परंतु या प्रस्तावाला पंढरपुरातील काही वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या वारकर्‍यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करा, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचे संकट पाहता २४ नोव्हेंबर रोजी होणारी कार्तिकी यात्राही आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक करावी. यात्रा कालावधीच्या प्रमुख दिवशी ७ ते ८ लाख लोकांची गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट येथे केंद्रित झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्याने अथवा वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश नको, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!