Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडराज्यातील भूमाफीयांना दणका; इनामी जमीनीच्या सातबारात नाव लावणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

राज्यातील भूमाफीयांना दणका; इनामी जमीनीच्या सातबारात नाव लावणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल


बोगस खालसा प्रकरणी पहिली विकेट,अधिकारी कर्मचारी यांची पण चौकशी करा; दर्गाचे नाव सात बारातून खोडून स्वतःची नावे
लावणार्‍यांचा काउंटडाऊन सुरू, बोगस सह्या शिक्यांचा होणार पर्दाफाश, मालमत्ता नावावर करुन घेणारे नातेवाईक फुकट्या अडचणीत

बीड (रिपोर्टर)ः-दैनिक रिपोर्टरने बोगस खालसा संदर्भात इनामी जमीन व देवस्थान जमीनी या विषयी पर्दाफाश केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल थेट पालकमंत्री यांनी घेत चौकशी समिती बनविली. परंतू त्यापुर्वीच बीडचे जिल्हाधिकारी यांनी २०१८ व त्यापुर्वीचे काही बोगस खालसा झालेले इनामी जमीनीचे आदेश रद्द करण्यासाठी निर्देश दिल्यानंतर प्रशासकीय कारवाया सुरू झाल्या. त्या अनुंषगाने जिल्ह्यातील अनेक इनामी जमीनीचे फेर रद्द करण्याचे आदेश आले. याचा पाठपूरावा जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी अमिन जमा सतत करत होते. त्याचाच परिणाम आष्टी तालुक्यातील दोघांवर इनामी जमीनीच्या सात बारावर नाव लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून रिपोर्टरने केलेल्या इनामी जमीनी संदर्भाची चळवळ यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. बोगस खालसा प्रकरणी ही पहिली विकेट असली तरी राज्यातील भूमाफीयांना हा मोठा दणका असून दर्गाचे नाव सात बारातून खोडून स्वतःची नावे लावणार्‍यांचे काउंटडाऊन सुरू झाले असून आता बोगस सह्या, शिक्के याचा पर्दाफाश होणार आहे. विशेष म्हणजे काहींनी बोगस खालसा करतांना आपल्या नातेवाईकांच्या नावाने केलेला असावा. ही मालमत्ता नावावर करुन घेणारे नातेवाईक फुकटच्या अडचणीत आले असून पोलीस अधिक्षकांनी आष्टी प्रकरणात विशेष लक्ष दिल्याने इनामी जमीन संदर्भात पहिला गुन्हा दाखल झालेला आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील मजीद व दर्गा इनाम जमीन तेथील इनामदार यांना खिदमत करण्यासाठी देण्यात आली होती. परंतू या दोघांनी स्वतःचे नाव सात बारात लावून सदरची जमीन वर्ग एक मध्ये रुपांतर केली. सदर जमीनीत अपहार झाल्याची खात्री होती. म्हणून जिल्हा वक्फ अधिकारी अमिन जमा व समाजसेवक अजीम मौलाना हे विशेष लक्ष देवून या प्रकरणाचा पाठपूरावा करत असतांना आष्टी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारही देण्यात आली होती. परंतू गुन्हा दाखल होत नसल्याने जमा यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी गुरूवारी सायंकाळी आष्टी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून याचा तपास आष्टी पोलीस करत आहे. बोगस खालसाप्रकरणी रिपोर्टरने पर्दाफाश केल्यानंतर इनामी जमीनीत अपहार करणार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करावा यासाठी दैनिक रिपोर्टरने आपली चळवळ सुरुच ठेवली असून जोपर्यंत प्रत्येक आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत रिपोर्टर इनामी जमीन संदर्भा विषयी आपली भूमीका ठामपणे मांडणार यात काही शंका नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!