Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमबीडमध्ये नर्सवर तर परळीत मेहुणीवर बलात्कार

बीडमध्ये नर्सवर तर परळीत मेहुणीवर बलात्कार


बीड/परळी (रिपोर्टर):- बीड जिल्हा रूग्णालयात कंत्राटीवर असलेल्या एका नर्सवर बलात्कार करण्यात आल्याने त्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला तर परळी शहरामध्ये थर्मल कॉलनीमध्ये राहणार्‍या मेहुणीवर अत्याचार झाला. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


बीडच्या जिल्हा रूग्णालयात कंत्राटीवर असलेल्या एका नर्सवर पुरूषोत्तम मस्के (वय25) या तरूणाने बलात्कार केल्याने पिडितेने रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी बलात्काराची घटना परळी शहरातील थर्मल कॉलनी भागात घडली. राहुल सुधाकर गुत्तेदार रा.गुलबर्गा वय 35 वर्षे हा आपल्या मेहुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने मेहुणीसाठी ज्युस आणले होते. या ज्युसमध्ये गुंगीचे औषध टाकून त्याने मेहुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून राहुल गुत्तेदार याच्या विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!