Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडमला पक्ष स्थापन करायची गरज नाही समाजासाठी शिपाई होऊन रस्त्यावर उतरेल- छत्रपती...

मला पक्ष स्थापन करायची गरज नाही समाजासाठी शिपाई होऊन रस्त्यावर उतरेल- छत्रपती संभाजीराजे


गेवराई (रिपोर्टर):- माझ्या समाजाच्या मागण्यांसाठी आणि प्रश्नांसाठी मला पक्ष स्थापन करण्याची गरज नाही. त्यासाठी मला राजकीय पदाचीही गरज नाही. मी शिपाई होऊन तुमच्या सोबत रस्त्यावर उतरून सत्ताधार्‍यांना निर्णय घेण्यास भाग पाडणार असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले.


ते गेवराई येथील जनसंवाद यात्रेमध्ये बोलत होते. पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम बहुजन समाजातील विविध घटकाला इ.स. 1902 मध्ये आरक्षण दिले. वंचित घटकांना आरक्षण देऊन त्यांना इतरांच्या बराबरीत आणण्याचा तो प्रयत्न होता. सत्तर टक्के मराठा समाज हा गरीब आहे. त्याला आरक्षणाची नितांत गरज आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण अशा स्थितीतही का दिले जात नाही? असा सवाल करत जातीय विषमता वाढत असल्याने ती वाढू नये या मताचा मी असून बहुजन समाजासाठी मी नाही तर कोण पुढे येणार? असा सवाल करून बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे,
सत्तेत आणि बाहेर सर्व राजकीय नेत्यांनी आता एकत्र यायला हवे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. केवळ राजकारण केलं जातं. सत्तेचा उपभोग घेताय मग आरक्षण देण्याबाबतची भूमिका का घेत नाहीत. ती भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही म्हणून आरक्षणाबाबत मी पुढाकार घेतल्याचे त्यांनी म्हटले. सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो, आता समाजाला वेठीस धरू नका. 58 मोर्चे काढले. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आता पुढार्‍यांनी, सत्ताधार्‍यांनी बोलायला हवे. 17 मागण्या असताना त्यातील पाच-सहा मागण्या तरी पुर्ण करा, असं म्हणत मराठा समाजाने आता सारथीचा फायदा घ्यावा. मराठा तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!