Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडपुढार्‍यांनी आता मराठा समाजाला फसवू नये -छत्रपती संभाजीराजे जाती विषमता दूर करण्यासाठी...

पुढार्‍यांनी आता मराठा समाजाला फसवू नये -छत्रपती संभाजीराजे जाती विषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा


बीड (रिपोर्टर):- कुठल्याही जातीच्या विरोधात अथवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही. जाती विषमता दूर करण्यासाठी माझा लढा असून ओबीसी समाजाला दुखवून मी कुठलेही काम करू शकत नाही. मी शिव व शाहुंचा वंशज आहे. आता लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढार्‍यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले.


ते जनसंवाद यात्रे दरम्यान बीड जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी आज सकाळी बीडच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ओबीसी समाजाला दुखवून मी कोणतेही काम करू शकत नाही. जाती-विषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्या जातीविरोधात अथवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही. लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला वेठीस धरू नये. राज्य सरकारला आरक्षणाचा अधिकार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे दिशाभूलही कोणी करू नये. सर्व पुढार्‍यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे. मी शिव आणि शाहुंचा वंशज आहे. अठरापगड जातींना एकत्र करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. ओबीसींना दुखवून मी कोणतेही काम करू शकत नाही. त्यामुळे तसं बोललो, पुढार्‍यांनी आता समाजाला फसवू नये. जे खरं आहे ते सांगावं. 102 व्या घटना दुरुस्तीचे राज्याचे अधिकार आता संपुष्टात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का? असा सवाल करत निघत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. पवार साहेबांची मी भेट घेतली, ते मराठा आरक्षणसंदर्भात सकारात्मक आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठिशी आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे. मात्र बहुजनांच्या प्रश्ना संदर्भात मी सदैव त्यांच्या पाठिशी आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!