Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडनिष्क्रिय केंद्र सरकारचे धोरण हाणून पाडा जि.प.सभापती जयसिंग सोळंके यांचे टीकास्त्र

निष्क्रिय केंद्र सरकारचे धोरण हाणून पाडा जि.प.सभापती जयसिंग सोळंके यांचे टीकास्त्र


इंधन दरवाढी निषेधार्थ रास्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद 
माजलगाव : रिपोर्टर केंद्रात सत्तारूढ असलेल्या मोदी सरकारने गरीबांना केवळ आश्वासने देवून झुलवत ठेवले आहे. आजमितीला इंधनाचे भाव गरीबांना न परवडणारे आहेत. एकीकडे केवळ आश्वासने द्यायची आणि दुसरीकडे गरिबांची पिळवणूक करायची असे धोरण मोदी सरकारने आखले आहे, ते हाणून पाडण्याची गरज असून थापाड्या केंद्र सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके यांनी केंद्र सरकार टीकास्त्र सोडले. ते रविवारी माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी बोलत होते. 
 पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. इंधनाची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ रविवार, दि.4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके यांनी केले. यावेळी जि.प.सभापती कल्याण आबूज, पं.स.सभापती भागवत खुळे, बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन एन.टी.सोळंके, जि.प.सदस्य प्रा.प्रकाश गवते, अॅड.शरद चव्हाण, विश्वांभर थावरे, अॅड.प्रमोद तौर, नगरसेवक भागवतराव भोसले, दयानंद स्वामी, कचरू खळगे, मनोहर डाके, नासेर खाँ पठाण, सिध्देश्वर गोळेकर, भगवान कदम, रूख्मानंद खेत्री, सुनिल शिंदे, संतोष काळे, राजू कुरेशी,  अनवर पटेल, लतिफ नाईक आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना जि.प.सभापती जयसिंग सोळंके म्हणाले, गरिबांच्या हिताआड येणारे केंद्र सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत आहे. वास्तविक पाहता विकासाच्या नावाखाली देश भकास होत आहे. कोरोना काळातही राज्य सरकार प्रभावी काम करत असताना केंद्र सरकारचे पाहीजे तेवढे सहकार्य मिळत नाही, असा आरोपही सोळंके यांनी केला.

‘केंद्र सरकारचा निष्क्रिय कारभार गरिबांच्या मुळावर’

आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके म्हणाले, केंद्राच्या कुचकामी धोरणामुळे गरिबांचे हाल होत आहेत. इंधन दरवाढीमुळे अक्षरशः गरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे, अशा निष्क्रीय केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!