Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईशेतकरी महिलांनी छत्रपती संभाजीराजेंना मराठा आरक्षण दौऱ्यासाठी दिली एकदिवसाची रोजंदारीची रक्कम

शेतकरी महिलांनी छत्रपती संभाजीराजेंना मराठा आरक्षण दौऱ्यासाठी दिली एकदिवसाची रोजंदारीची रक्कम

शेतकरी माय माऊल्यांचे आशीर्वाद म्हणून ही मदत स्वीकारतो – छत्रपती संभाजीराजे

गेवराई (रिपोर्टर) छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी कालपासून पुणे येथून दौरा सुरवात केली आहे.आष्टी,जामखेड असा दौरा करून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात छत्रपती संभाजीराजे हे जनसंवाद कार्यक्रम साठी आले होते.यावेळी ग्रामीण भागातील शिवणकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला,शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी राजेंना पुढील दौऱ्यासाठी मदत म्हणून एक दिवसाला शेतात काम करून जेवढी हजेरी मिळते तेवढी रक्कम दिली.कोरोना महामारीची व राजकीय परिणामांची चिंता न करता छत्रपती संभाजीराजे आपल्या लेकराबाळांच्या आरक्षणासाठी झटत आहेत.त्यासाठी आम्ही आमच्या कष्टाने कमावलेला दोन पैसे देऊन या आरक्षणाच्या चळवळीत देऊ इच्छितो अशी भावना शेतकरी महिलांनी मांडली.छत्रपती संभाजीराजेंनी देखील शेतकऱ्यांचे आशीर्वाद म्हणून ही रक्कम स्वीकारली.तसेच गंगावाडी,चव्हानवाडी,पांढरी,मिरगाव,गोविंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी राजेंना पत्र देऊन आपल्या भावना कळवल्या. यावेळी पूजाताई मोरे,किस्किदा कानगुडे, सीमा होंडे,अनिता शेळके, मीनाक्षी उढाण,अंजली जाधव,शालिनी जाधव,क्रांती गोगले, दीक्षा मोरे,वायाळ ताई,खिसाडे ताई उपस्थित होत्या.

Most Popular

error: Content is protected !!