Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईदोन दिवसाच्या अधिवेशनाने मतदारसंघाचे नुकसान - आ. लक्ष्मण पवार

दोन दिवसाच्या अधिवेशनाने मतदारसंघाचे नुकसान – आ. लक्ष्मण पवार

गेवराई (रिपोर्टर)  : महाविकास आघाडी सरकारने फक्त दोन दिवासाचे पावसाळी अधिवेशन ठेवले आहे. त्यामुळे, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा आरोप आ. लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की,  गेवराई विधानसभा मतदारसंघातील २०२० साली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच पिकविमा भरलेल्या अनेक  शेतक-यास आॅनलाईन तक्रार करता आली नाही, म्हणून शेतकऱ्यांनी आॅफलाईन तक्रार केली आहे. त्यामुळे पिकविमा समितीने दहा दिवसांच्या आत तक्रार निकाली काढणे आवश्यक असताना, अनेक शेतकरी पिकविम्या पासुन वंचीत आहेत. वंचित शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा म्हणून, आपण पावसाळी अधिवेशनात ताराकीत प्रश्न केला आहे. लाॅकडाऊन च्या काळात प्रशासनाने ठरवुन दिलेल्या वेळेत बियाणे खरीदी करण्यासाठी आलेल्या किनगाव येथील शेतक-यास पोलीसांनी मारहाण केलेली आहे. त्यामुळे सदरील पोलीसांनवर कारवाई करण्यासाठी प्रश्न उपस्थित केला आहे.  सरकारने गेवराई विधानसभा मतदारसंघासाठी ट्रॅक्टर ने वाळुचे वहातुक करावी म्हणून सरकारने परिपत्रक काढले होते. गेवराई विधानसभा मतदारसंघासाठी शासनानेच्या नियमांचे पालन केले जात नाही. माजलगाव तालुक्यातील वाळू वहातुक करताना सरकारच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखलत  माजलगाव तालुक्यातील वाळू घाटावरून १ते९२ अटी व नियमांचे उल्लंघन होत असल्राने, आपण त्यासाठी तारांकित प्रश्न केला आहे. तसेच, अमृता नदीवरील ईजिमा १७ भोजगाव येथील पुल २०२० ला झालेल्या परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. भोजगाव येथील पुल नव्याने बांधण्यात यावा म्हणून ही ताराकीत प्रश्न केला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कोवीडचे कारण देत यावर्षीचे पावसाळी अधिवेशन दि.५ व ६ जुलै असे फक्त दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्याने, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे आ. लक्ष्मण पवार यांनी मत व्यक्त केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!