Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडकोरोनाचं संकट, पिक विम्याचं नाटक आभाळ फाकलं, शेत उन्हाने तापलं

कोरोनाचं संकट, पिक विम्याचं नाटक आभाळ फाकलं, शेत उन्हाने तापलं


शेतकर्‍यांच्या तोंडचं पाणी पळालं, ३० टक्क्यांपेक्षा जास्त पेरा, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट?
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यंदाही हवामान खात्याचा अंदाज भरकटलेला दिसून आला असून पावसाळ्यातला अख्खा महिना गेला असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. जेमतेम पावसावर जिल्हाभरात सोयाबीन, कापूससह अन्य पिकांचा ३५ टक्केपेक्षा जास्त पेरा झाला आहे. आता पावसाची प्रतीक्षा असून येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येत आहेत.

जून महिन्यात मान्सून जिल्ह्यात डेरेदाखल झाला. मान्सूनपुर्व पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन आणि कापसाचा पेरा केला. पुढे मान्सूनचे तुरळक शिडकाव झाले, काही ठिकाणी मात्र एक ते दोन पाऊस मोठे झाले. परंतु ३५ टक्केपेक्षा जास्त पेरा केलेल्या शेतकर्‍यांच्णया पिकाला जिवदान देणारे पाऊस पडले नसल्याने आणि गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात पावसाचा थेंबही पडला नसल्याने जिल्ह्यातील ३५ टक्केपेक्षा जास्त पेरा करणार्‍या शेतकर्‍यांचे पीक पाण्याअभावी संकटात सापडले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकर्‍यांवर दुबारपेरणीचे संकट येऊन ठेपण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर असून पावसाची वाट पहात आहे. अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीन पेर्‍यात आणि कापसाच्या लागवडीत आत्ताच १५ टक्के ते ४० टक्के तूट झाल्याची ओरड होत आहे. काही ठिकाणी अद्याप पेरण्यात झाल्या नाहीत. यावर्षी पावसाने हात आखडता घेतल्याने आणि कोरोनाच्या कालखंडात पडलेल्या लॉकडाऊनमध्ये फळभाज्या उत्पादक शेतकर्‍यांना बसलेल्या आर्थिक फटक्याने शेतकरी आधीच आर्थिक कोंडीत असताना दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसाठी जीवघेणे वाटत आहे.

शेतकर्‍यांना अद्याप पिक विमा नाही
गतवर्षी शेतकर्‍यांच्या शेतात पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामेही करण्यात आले. यामध्ये काही शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला मात्र बहुतांशी शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यांना अद्याप पिक विमा मिळाला नसल्याने आणि दुबार पेरणीचे संकट समोर येऊन ठेपल्याने शेतकरी चिंतातूर दिसून येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!