Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडमहागाईच्या विरोधात आरसा फाऊंडेशन रस्त्यावर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा

महागाईच्या विरोधात आरसा फाऊंडेशन रस्त्यावर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा


बीड (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. इंधनासह गॅसचे दर वाढु लागल्याने याचा परीणाम सर्वसामान्य नागरीकांना सहन करावा लागत आहे. आज महागाईच्या विरोधात आणि निराधाराचे प्रश्‍न घेवून आरसा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी आरसा फाऊंडेशनने मोर्चा काढुन शासनाचा निषेध व्यक्त केला. महागाई वाढत आहे, या महागाईचा विरोध करत निराधारांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अनेक महिलांची उपस्थिती होती. आपल्या मागण्याचे निवेदन आरसा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी रूक्मिण नागापुरे, मंगल कानडे, सुजाता मोराळे, अर्चना सानप यांच्यासह आदी महिलांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!