Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडमहागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे जिल्ह्यात निदर्शने केजच्या तहसीलसमोर महिलांनी चुल मांडुन थापल्या भाकरी

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे जिल्ह्यात निदर्शने केजच्या तहसीलसमोर महिलांनी चुल मांडुन थापल्या भाकरी


बीड (रिपोर्टर):- केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी वाढवत असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसू लागला. २-४ दिवसाला पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर वाढत असल्याने नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे. महागाईच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली. केजच्या तहसील कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी चुलीवर भाकरी थापत केंद्राचा निषेध केला. तर जिल्ह्यात इतर सर्व तालुका तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून महागाईच्या विरोधात आंदोलन केले.


केंद्र सरकारने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र महागाई कमी न होता ती दिवसेंदिवस वाढु लागली. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दर वाढ दोन-चार दिवसाला वाढत असल्याने या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसु लागला. आज जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिलांनी तहसील कार्यालयासमोर चुली मांडुन त्या ठिकाणी भाकरी थापत केंद्राचा निषेध केला. गेवराई तहसील कार्यालयासमोर माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यासह इतर सर्व तालुकास्तरावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!