Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईमागासवर्गीयांचा तिटकारा करणारे आमदार संजय गायकवाडसह तहसीलदार सचिन खाडे यांना निलंबित करा-डॉ...

मागासवर्गीयांचा तिटकारा करणारे आमदार संजय गायकवाडसह तहसीलदार सचिन खाडे यांना निलंबित करा-डॉ जितेंद्र ओव्हाळ


रस्तारोको करुन केला निषेध
गेवराई (रिपोर्टर): अट्रोसिटी विरोधात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्याची भाषा करणारे शिवसेनेचे बुलढाणा विधान सभेचे आमदार संजय गायकवाड व मागासवर्गीय शेतकर्‍यांना आरेरावी करीत दमदाटी करणारे गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांच्या विरोधात संताप व्यक्त करित बागपिम्पळगाव गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले


या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले कि आमदार संजयगायकवाड व गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे तुम्हाला मागासवर्गीयांची आसल्याचे समोर आले आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खुर्च्या आहेत लोकांना धमक्या टाकण्यासाठी नाही याचा भान ठेवा आसा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी तातडीने संजयगायकवाडची आमदार की रद्द करावी व गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांच्या वर निलंबणाची कारवाई करावी नसता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्याचा इशारा या वेळी दिला निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले या वेळी गेवराई ता अध्यक्ष विकास वाव्हळ युवक ता अध्यक्ष श्याम साळवे, सचिव संजय वा्‌हळ,पंडित सूतार बंडू देवडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!