Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमस्कॉर्पीओ घेण्यासाठी पोलीसाकडून पत्नीचा छळ; शिवाजी नगरच्या पोलीसावर तलवाड्यात गुन्हा दाखल

स्कॉर्पीओ घेण्यासाठी पोलीसाकडून पत्नीचा छळ; शिवाजी नगरच्या पोलीसावर तलवाड्यात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)ः- स्कॉर्पीओ गाडी घेण्यासाठी तुझ्या माहेरकडून १० लाख रुपये घेवून ये असा म्हणत मारहाण केल्याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या नितीन भिवाजी सोनवणे या पोलीस कर्मचार्‍यांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात ४९८ नूसार गुन्हा दाखल झाला आहे.
सिमा नितीन सोनवणे रा.गोविंद नगर धानोरा रोड बीड(ह.मु.नांदलगांव ता.गेवराई) यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले नितीन सोनवणे यांच्यासोबत माझा विवाह झाला होता. त्यानंतर काही महिन्यातच मला पैश्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आला. स्कॉर्पीओ गाडी घेण्यासाठी तुझ्या माहेरकडून दहा लाख रुपये घेवून ये असे म्हणून उपाशी पोटी ठेवून धमकी देवू लागले. नितीन सोनवणे हे स्वतः पोलीस असल्याने माझं कोणीच काही करु शकत नाही, मला कायदे माहीत आहे असे म्हणून पैसे घेवून न आल्यास तुला जिवंत मारुन टाकू असे म्हणत त्रास देवू लागले.या प्रकरणी सिमा सोनवणे यांनी महिला तक्रार निवारण केंद्राकडेही अर्ज दिला होता. मात्र तेथे देखील सासरचे लोक आणि नितीन सोनवणे हजर झाले नाही. त्यामुळे अखेर सिमा सोनवणे यांनी तलवाडा पोलीस ठाणे गाठून नितीन सोनवणे, भिवाजी सोनवणे, गंधारी सोनवणे, मोहन सोनवणे, रेखा सवई, आरती सोनवणे, सचिन सोनवणे, सुनंदा सोनवणे, मिलींद सोनवणे, पुजा सोनवणे, आश्रुबा सोनवणे, शिवाजी सोनवणे, संगीता सोनवणे यांच्या विरुध्द ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!