Home बीड गेवराई १२ आमदारांचे निलंबन प्रकरणी गेवराई भाजपाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध

१२ आमदारांचे निलंबन प्रकरणी गेवराई भाजपाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध


गेवराई: (रिपोर्टर) महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आरुढ झाले आहे तेव्हा पासून महाराष्ट्रात विकास खुटंला आहे. तसेच महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने उच्छाद माडला आहे गेली दिड वर्षा पासून कोवीड नावाच्या महामारीने थैमान घातले आहे, अशा परिस्थितीत सरकार म्हणून जनतेला आधार देणे आवश्यक असताना महाराष्ट्रातील आघाडी सरकार मात्र वसुली करण्यात दंग आहे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण,शेतक-याचे प्रश्न, असे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने कोवीडचे कारण देत पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसाचे अधिवेशन घेऊन सरकार जनतेच्या प्रश्नां पासुन पळ काढत आहे.


दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने लोकशाही ला तिलांजली देत बहुमताच्या जोरावर भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करून लोकशाही च्या मंदिरात जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न निषेधार्थ गेवराईत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे आहे त्या घटनेचा निषेध म्हणून गेवराई भाजपाच्या वतिने आज दि. ६ जुलै रोजी सकाळी गेवराई तहसील कार्यालया समोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेद्र राक्षसभुवनकर, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दादासाहेब गिरी, सभापती दिपक सुरवसे, शहराध्यक्ष याहिया खॉन, पं. स. सदस्य जगन आडागळे, शाम कुंड, नगरसेवक भरत गायकवाड,कृष्णा काकडे, सचिन मोटे, आप्पासाहेब कानगुडे, धम्मपाल सौदरमल, पवार, लक्ष्मण चव्हाण, ईश्वर पवार, प्रल्हाद येळापुरे, संतोष लाखे, विलास सुतार, मधुकर यादव, पिटु पानखडे,शौहेब आत्तार, नितीन शेट्टे, हनुमान येवले,सचिन वावरे, भगवान कदम दशरथ पंडीत, दत्ता गिरी, आदि उपस्थित होते. यावेळी ना. तहसीलदार विटेकर यांना निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version