Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडवडवणीपेट्रोल-डिसेल, गँस आगे बढो, गोडतेल तुम्हारे साथ है! मोदी सरकारविरोधात वडवणीत राष्ट्रवादीचा...

पेट्रोल-डिसेल, गँस आगे बढो, गोडतेल तुम्हारे साथ है! मोदी सरकारविरोधात वडवणीत राष्ट्रवादीचा रस्तारोको


वडवणी (रिपोर्टर):- भाजपाच्या मोदी सरकारने पेट्रोल-डिसेल,गँस आणि खाद्यतेलात प्रंचड वाढ केली असून हि दरवाढ तात्काळ अटोक्यात आणावी तसेच शेतीच्या मालात भरीव वाढ करण्यात यावी यामागणीसाठी आज वडवणीत राष्ट्रवादीचा जबरदस्त रस्तारोको करण्यात आला.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुत हुई महगाई अब कि बार मोदी सरकार म्हणत भाजपा पक्ष केंद्रस्थानी बसला.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तसे पेट्रोल-डिसेल आणि गँस बरोबर खाद्यतेलाचे देखील भाव गगनाला भिडले.तर देशाचा कणा असणार्‌या शेतकरी राजाच्या शेतीमालाला देखील योग्य भाव न देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.म्हणून या केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी आणि सदरील भाववाढ तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या आदेशाने व माजलगांव विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते आ.प्रकाश सोंळके व युवा नेते तथा जि.प. बांधकाम सभापती जयसिंह सोंळके यांच्या नेतृत्वाखाली वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आज सकाळी साडेदहा वाजता जबरदस्त एक तास रस्तारोको करत पेट्रोल-डिसेल,गँस भाववाढ आगे बढो,गोडतेल तुम्हारे साथ है!,मोदीसरकारचे करायचे काय खाली मुंडक वर पाय,कमी करा कमी पेट्रोल-डिसेल आणि गँस भाववाढ कमी करा यासह अन्य घोषणा या रस्तारोको दरम्यान करण्यात आल्या आहेत.या रस्तारोकोमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक दिनेश मस्के, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बजरंग साबळे,माजी शहरध्यक्ष संतोष डावकर,शहारध्यक्ष विठ्ठल भुजबळ,युवा शहरध्यक् संतोष पवार,पंचायत समिती सभापती बळीराम आजबे,जेष्ठ नेते पंजाबराव शिंदे,माजी सरपंच भीमराव उजगरे, नगरसेवक सतीश बडे,अस्लम कुरेशी,श्रीराम मुंडे,नगरसेवक संभाजी शिंदे, माजी सभापती गणेशराव शिंदे,सुग्रीव मुंडे,शेख समशेर भाई, सचिन लंगडे,ज्ञानेश्वर सुरवसे, सरपंच माधव शेंडगे,भारत निसर्गंध,अंगद घुगे, कल्याण राऊत,सरपंच संदिपान खळगे,सरपंच सुभाष सावंत,सरपंच सुधाकर मुंडे,शेख समशेर,आबेदभाई शेख,सरपंच लखन महागोंविद, नारायण शेळके, अशोक निपटे, भास्कर उजगरे, मानवी हक्क अभियान तालुका अध्यक्ष विष्णू मुजमुले,मुस्ताकिन शेख,रमेश मुंडे,कारभारी वीर,अनिरुध्द मस्के, राहुल चिंचकर,धनंजय जाधव यांच्या शेकडो कार्यकर्त्यासह,नागरिक उपस्थित होते.तर मागण्याचे निवेदन हे तहसिल प्रशासनला देण्यात आले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!