Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडपरळीमहागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा परळीत एल्गार!

महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा परळीत एल्गार!


छत्रपती शिवाजी महाराज चौकात चूल मांडून भाकरी थापणार्‍या खासदार ताई महागाईविरोधात संसदेत कधी बोलणार-अजय मुंडेंनी केला सवाल
परळी(रिपोर्टर): अच्छे दिनचे स्वप्न दाखवुन केंद्रातल्या भाजप सरकारने जनतेला महागाईच्या दरीत ढकलले आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. याविरोधात मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब, मा.ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. आज महात्मा गांधींच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत परंतु केंद्र सरकारने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही भगतसिंगांचा मार्ग अवलंबून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी दिला आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड जिल्हा परिषदेतील गटनेते अजय मुंडे यांच्या नेतृत्वात महागाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी परळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परळी येथे तीव्र आंदोलन करत अच्छे दिनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत गॅस दरवाढी विरोधात महिलांचे चूल मांडून आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

8 1


घरगुती गॅसच्या किमती ५०० रुपयांच्या आत असताना पूर्वीच्या सरकारच्या काळात परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात चूल मांडून भाकरी थापणार्‍या जिल्ह्याच्या खासदार ताई आज संसदेत महागाईविरोधात का बोलत नाहीत, असा सवालही यानिमित्ताने अजय मुंडे यांनी उपस्थित केला.
यावेळी अजय मुंडे यांच्या सह रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. संतोष मुंडे आदींची भाषणे झाली. यावेळी बाळासाहेब देशमुख, दीपक देशमुख, किशोर पारधे, माणिकभाऊ फड, अय्युबभाई पठाण, माऊली तात्या गडदे, सुरेश टाक, विजय भोईटे, गोपाळ आंधळे, राजाभाऊ पौळ, संजय फड, वैजनाथ सोळंके, अनिल अष्टेकर, वैजनाथ बागवले, राजाखान पठाण, कुमार व्हाव्हरे, लालाखान, जयपाल लाहोटी, सरचिटणीस अनंत इंगळे, अजीज कच्ची, सय्यद सिराज, मोहनराव सोळंके, रामेश्वर कोकाटे, वसंत तिडके, राजेंद्र सोनी, भरत शिंदे, रवींद्र परदेशी, विनायक राठोड, दत्ता सावंत, शंकर कापसे, सुरेश नानवटे, माणिक सातभाई, भागवत मुंडे, मोहन मुंडे, कामलकिशोर सारडा, प्रा.रघुनंदन खरात, अल्ताफ पठाण, गफार काकर, बळीराम नागरगोजे, अमर रोडे, ज्ञानेश्वर होळंबे, अमित केंद्रे, बालाजी गित्ते, तुकाराम आघाव, महिला आघाडीच्या अन्नपूर्णाताई जाधव, संगीता धुमाळ, चित्राताई देशपांडे, अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोईटे यांसह आदी उपस्थित होते.
महागाई विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे, यातूनच केंद्र सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध झाला आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आणखी तीव्र करून सर्व सामान्य जनतेचा आवाज बुलंद करू, असेही यावेळी बोलताना अजय मुंडे म्हणाले. यावेळी महागाई विरोधात निषेध व्यक्त करत पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आदी वस्तूंच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!