Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeकोरोनाशाळा-खोल्या सॅनिटाईज्ड्, शिक्षकांच्या चाचण्या सुरू

शाळा-खोल्या सॅनिटाईज्ड्, शिक्षकांच्या चाचण्या सुरू

सोमवारपासून शाळांना सुरुवात, पालकांच्या संमती पत्रावर पाल्य शाळेत, शाळेसाठी सक्ती नाही
बीड (रिपोर्टर)- कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांचे गेट अखेर येत्या सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी उघडले जाणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेऊन इयत्ता ९ वी ते १२ वीच्या वर्गांना सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने शाळा खोल्या सॅनिटाईझ्ड होत असून शिकवणीसाठी जाणार्‍या शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्यांना कालपासून बीडमध्ये सुरुवात झाली आहे. पालकांच्या संमती पत्रावर पाल्य शाळेत येणार असून शाळेत येण्यासाठी कोणालाही सक्ती करण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने सांगत काही मार्गदर्शक सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. २३ नोव्हेंबर सोमवार रोजीपासून इयत्ता नववी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात सोशल डिस्टन्स पाळून शिकवणी सुरू आहेत. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात शाळा खोल्या सॅनिटाईज्ड करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी जाणार्‍या शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्या कालपासून सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शाळेची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची लेखी संमती घेणे, एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी बसवणे, विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर सर्वाधिक भर देणे, केवळ चारच तासिका घेण्याबाबत सांगण्यात आले असून जर एखाद्या वर्गात विद्यार्थी जास्त असेल तर आज अर्धे आणि उद्या अर्धे असे विद्यार्थ्यांचे नियोजन करणे या सूचनांच्या आधारे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शाळांमध्ये ज्ञानार्जन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!