Home क्राईम बनावट दस्ताऐवज प्रकरणी तलाठ्यासह दोघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बनावट दस्ताऐवज प्रकरणी तलाठ्यासह दोघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल


वडवणी (रिपोर्टर):- शेती जागेचा साताबारावर बोजा आसताना देखील तो न दाखवता बनावट दस्ताएवज तयार करुन खरेदी खत करुन दिल्या प्रकरणी वडवणी तालुक्यातील साळींबा सज्जाचे तात्कालीन तलाठी व अन्य दोघा जणांवर वडवणी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील हा गुन्हा ज्ञानराधा मल्टीस्टेट को-आँप क्रेडिट सोसायटी लि.बीड शाखा-वडवणीचे शाखा व्यवस्थापक राजा विष्णू पोकळे यांनी दाखल केला आहे.तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे कि,आत्माराम बळीराम जाधव यांच्या जमिनीवर ज्ञानराधा बँकेच्या नावे गहाण खत करुन दिली आसताना त्यांनी जगन्नाथ दादाराव तोगे यांना जमिन विकली व त्याकाळचे तात्कालीन तलाठी असणारे एस.एस.राठोड यांनी सदरील जागेचा साताबारा यावर बोजा आसताना हि तो न दाखवता बनावट दस्ताएवज तयार करुन खरेदीखत करुन दिले आहे.हा सर्व प्रकार दि.५ मे २०१४ ते २५ जुलै २०२१ या कालवधीत घडला आहे.म्हणून शाखाव्यस्थापक राजा विष्णू पोकळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी आत्माराम बळीराम जाधव व जगन्नाथ दादाराव तोगे रा.साळींबा यांच्या तात्कालीन तलाठी एस.एस.राठोड यांच्यावर गु.र.नं.१४१/२०२१ कलम ४२०, ४१८, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version