Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमपत्नी किर्तनाला, पतीचा तमाशा किर्तनस्थळी दगडफेक, तलवारबाजी पत्नीसह अन्य चार जणांना दुखापत

पत्नी किर्तनाला, पतीचा तमाशा किर्तनस्थळी दगडफेक, तलवारबाजी पत्नीसह अन्य चार जणांना दुखापत


परळी (रिपोर्टर):-पत्नी किर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भरकिर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार तालुक्यातील मालेवाडी येथे घडला आहे. या प्रकारात मारहाण झालेल्या पत्नीसह सोडवासोडवी करणार्या अन्य चार जणांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी या पिडीत महिलेनेच पती विरोधात फिर्याद दाखल केली असुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.६ रोजी रात्री ११.४७ वा.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी पासुन जवळच असलेल्या मालेवाडी येथे मारोती मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम होता. व्याकरणाचार्य हभप अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे किर्तन सुरु होते. तेव्हा आरोपी माणिक कुंडलिक बदने रा.मालेवाडी हा हातात तलवारीसारखे शस्त्र घेऊन आला.त्याची फिर्यादी पत्नी किर्तनात बसलेली होती. तिच्याजवळ जाऊन तु कोणाला विचारुन किर्तनाला आलीस असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करायला सुरुवात केली.यावेळी इतरांनी भांडण सोडवासोडवी करायचा प्रयत्न केला असता संतप्त होत त्याने दगड फेकुन मारले तसेच हातातील शस्त्र फिरवु लागला या झटापटीत साक्षीदार सुदामा पंडीतराव आंधळे, सरपंच भुराज वैजनाथ बदने, आदिनाथ संभाजी बदने, भरत रामकिसन आंधळे यांनाही दुखापत झाली. याप्रकरणी पत्नीनेच फिर्याद दिल्यावरुन आरोपी पती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं१३६/२०२१ कलम३२४,३३६, ३३७,३२३,५०४,भादंवि व४/२५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोउपनि जिरगे हे करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!