Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeराजकारणपंकजांच्या ट्विटनंतर अवघ्या दोन तासात यादी केंद्रीय मंत्रीमंडळात प्रितम मुंडेंना डावललं, कराडांना...

पंकजांच्या ट्विटनंतर अवघ्या दोन तासात यादी केंद्रीय मंत्रीमंडळात प्रितम मुंडेंना डावललं, कराडांना स्थान दिलं

बीड (रिपोर्टर): केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार म्हणून राज्यातील तरूण खासदारांना खास आमंत्रीत केल्याचे सांगण्यात येत होते. तेव्हा बीडच्या खासदार प्रितम मुंडे या देखील दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले मात्र या वृत्ताचा जाहिर खुलासा दुपारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विटदद्वारे करत प्रितम मुंडे आणि आम्ही घरीच आहोत, प्रितमताई दिल्लीत नसल्याचे म्हटले. त्या ट्विटनंतर अवघ्या दोन तासात केंद्रातील नव्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली.

https://twitter.com/Pankajamunde/status/1412703957474955265?s=19

यात प्रितम मुंडे यांचे नाव नाही परंतू डॉ.भागवत कराड यांची मात्र केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार याबाबतच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होत्या आज दिल्लीमध्ये महत्त्वपुर्ण बैठक होत केंद्रीय मंत्रीमंडळाची यादी जाहिर करण्यात आली. तत्पुर्वी आज सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचे नाव संभाव्य यादीमध्ये चर्चिले जात होते. अनेकजण दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्याही प्रसार माध्यमातून दाखवण्यात येत होत्या. त्यामध्ये बीडच्या खासदार प्रितम मुंडे दिल्लीत डेरेदाखल झाल्याची बातमीही दाखवण्यात आली होती मात्र ही बातमी दाखवली गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं त्या ट्विटमध्ये खासदार प्रितम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे मी, प्रितमताई आम्ही सर्व कुटुंबिय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत. असे म्हटले. या ट्विटनंतर अवघ्या दोन तासात केंद्रीय मंत्रीमंडळाची यादी जाहिर होत या यादीत महाराष्ट्रातील चार खासदारांना संधी देण्यात आली आहे, यामध्ये नारायण राणे, कपील पाटील, डॉ.भारती पवार आणि राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपर्यंत भागवत कराड हे महाराष्ट्रात होते. सकाळी त्यांना अर्जंट दिल्लीचे बोलावणे आले आणि ते केंेद्रात मंत्री झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवर मुंडेंना डावलून कराडांना संधी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!